महत्वाच्या बातम्या

 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने EVM/VVPAT DEMO मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने EVM/VVPAT DEMO मतदार जनजागृती कार्यक्रम मौजा ठाणेगाव येथे घेण्यात आला.

सदर प्रात्यक्षिके कार्यक्रमाचा ठाणेगाव येथील बहुसंख्य मतदार व नागरिकांनी लाभ घेतला. वरील कार्यक्रमामध्ये मतदारांच्या शंकेच निरसन करण्यात आले. 

सदर डेमो प्रात्यक्षिके जि.एम. कुंभरे मंडळ अधिकारी ‌वैरागड, संकेत कात्रटवार तलाठी ठाणेगाव डोंगरगाव साझा, दिपक लिंगायत कोतवाल यांनी करून दाखविले. 

यावेळी सरपंच वासुदेव मंडलवार, ग्राम पंचायत सदस्य स्नेहा भांडेकर, चंद्रशेखर किरमे ‌व गावातील मतदार,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos