महत्वाच्या बातम्या

 राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे : भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आजच्या युगात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे, असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीतात हिंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य महिला आघाडी आयोजित असलेल्या कार्यक्रमात केले.

आजच्या पिढीने देशाचा इतिहास विसरून चालणार नाही. देशातील महामानवाचे चरित्र प्रत्येक व्यक्तीने अभ्यासावे. शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला प्रचंड ऊर्जा व प्रेरणा मिळते, त्यांचे चरित्र डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येकाने आपले जीवन घडवावे. 

छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्यात स्वतःच्या सामर्थ्यावर अगदी सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून नवीन पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. अगदी कमी आयुष्यामध्ये अगदी सर्वांसाठी आदर्श ठरणाऱ्या शिवरायांचे चरित्र, विचार, जिद्द आणि प्रेरणा घेण्यासारखी आहे. त्यांचे गुण आत्मसात करून प्रत्येकाने आपले आयुष्य घडवावे, असा संदेश महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांनी दिला.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली च्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. 

यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे व  जिल्हा महामंत्री योगीता पिपरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, त्रिशा डोईजड, पल्लवी बारापात्रे, वैष्णवी नैताम, रश्मी बानमारे, पूनम हेमके, स्वाती चंदनखेडे, सिमा कन्नमवार, भारती खोब्रागडे तसेच भाजपा महिला आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos