महत्वाच्या बातम्या

 जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमीत्य अभिवादन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्य जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी विनम्र अभिवादन केले.

जिल्हा माहिती कार्यालयात दांदळे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तुषार उरकांदे, विजय जाधव, सुनिल फुलसुगे, जी.एन. सपाटे, रेखा निनावे, तसेच सुरेश फुलसंगे या कर्मचाऱ्यांनी दर्पणकार बाळशस्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.





  Print






News - Bhandara




Related Photos