महत्वाच्या बातम्या

 इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या पार्श्वभुमीवर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत १०० मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परीसरातंर्गत २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातंर्गत/ क्षेत्रातंर्गत सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन,ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राला लागू राहतील. हा आदेश उच्च माध्यमिक  प्रमाणपत्र  परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशित नमुद आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos