पुरपीडीतांना त्वरीत मदत मिळणार : आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
तालुक्यात अनेक गावांसह भामरागड  महारपुराच्या तडाख्यात सापडले असुन अनेकांची  घरे उध्वस्त झाली. अनेकांचे शेती, बोडी, तलाव वाहुन गेल्याने बोडीतील मच्छीबीज सुद्धा वाहून गेले. यामुळे  आर्थिक नुकसान झाले. तहसीलदार मार्फत नुकसान संबधी पंचनामे प्रक्रिया सुरु झाली असुन लवकरच शासनाकडून मदत मिळणार अशी ग्वाही अहेरी  विधानसभा क्षेत्राचे आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. पूरग्रस्त भामरागडला आमदार आत्राम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. 
 यावेळी पुरग्रस्तांनी मागील महीनाभरापासुन झालेल्या अतिव्रुष्टीमुळे सात वेळा पुराने वेढले.  ७ सप्टेंबरच्या पुरामुळे भामरागड तालुक्यासह शहराला चांगलच तडाखा बसला . मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  यासंदर्भात आपल्या व्यथा आमदार आत्राम यांच्यासमोर मांडल्या.  यावेळी पुरात सापडलेल्या सर्वांना मदत मिळणार असून शासन व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी  आहेत . तसेच वारंवार होत असलेल्या  नुकसान  संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कायमचा  तोडागा काढु .  भामरागड जावळी  पर्लकोटा नदीवरील ठेंगण्या पुलामुळे वारंवार भामरागडचा संपर्क तुटतो.  यामुळे  नवीन पुल बांधकामासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.  लवकरच नवीन पुल बांधकाम प्रक्रिया  सुरु होणार असल्याची माहिती  दीली . त्यानंतर नुकसानग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यलयाला भेट दीली. आढावा बैठकीला तहसीलदार कैलास अंडिल , एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने उपस्थित होते.  पुरग्रस्तासाठी मदत म्हणून विविध संस्था व संघटना कडुन आलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक भाजपाचे पदाधिकारी सुनील बिश्वास, जादव हलदार , जाकीर हुस्सेन , मलीन मंडल , अनंत बिस्वास , आनंद मिस्त्री , सम्राट मल्लीक ,नगर पंचायत सदस्य चिन्नन्ना चालुकर ,शंकर बडगे ,  बेबी पोरतेट , रंजना सडमेक ,  गावातील नागरिक सुधाकर एतावार , सब्बीरखॉ पठाण , सरकिर ,बबलु शील ,पिपरे पाटील , शंकर सडमेक ,गोपाल हलदार आदी 
उपस्थित होते. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-19


Related Photos