महत्वाच्या बातम्या

 राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी


- गरीब व गरजू नागरिकांना जीवणावश्यक साहित्य व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

त्या निमित्य तुमरगुंडा, जीवनगट्टा, एटापल्ली गावातील काही गरीब व गरजू नागरिकांना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. दुपारला २ वाजता ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता महाप्रसाद वितरित करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वारोहण करण्यात आले. 

त्यानंतर एटापल्ली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राजमुद्रा फाउंडेशन चे अध्यक्ष अनिकेत मामिडवार, उपाध्यक्ष मनीष धाली, सचिव अविष्कार गड्डमवार व संपूर्ण सदस्य तसेच एटापल्ली शहरातील प्रतिष्ठत नागरिक उपस्थित होते. संपूर्ण मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos