महत्वाच्या बातम्या

 नवेगाव माल तालुका चामोर्शी येथे आमदार देवराव होळी यांच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन


- आमदार स्थानिक विकास  निधीअंतर्गत १० लक्ष रुपयाचे काम आमदार यांनी केले नवेगाव माल येथे मंजूर

- विकासासाठी कोणत्याही गावाला निधी कमी पडू देणार नाही याची दिली हमी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मौजा नवेगाव माल तालुका चामोर्शी येथील आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत असणाऱ्या १० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सुप्रिया धुडसे, सरपंच चरण चौधरी, उपसरपंच दिलीप चलाख, तालुका अध्यक्ष साईनाथ बुरांडे, तालुका महामंत्री भोजराज भगत, तालुका महामंत्री तुमडे तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही गावाला आपण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. याची हमी या भूमी पूजनाच्या प्रसंगी आमदार देवराव होळी यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos