महत्वाच्या बातम्या

 भामरागड तालुक्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील ताडगाव, हेमलकसा व भामरागड या गावामध्ये तहसिल कार्यालय भामरागड मार्फत मतदान यंत्राची गावात जाडफन मतदानाबाबत माहिती देण्यात आली. 

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असुन मतदारांनी कोणत्या मतदाराला मतदान केले हे त्याला व्हीव्हीपॅट मध्ये सात सेकंद झाले कि दिसणार आहे. तसेच नवीन मतदारांना मतदान कसे करायचे याबाबत माहिती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मशीनबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. येथील मुख्य चौक मध्ये प्रात्यक्षिक करुन देण्यात आले.

यावेळी प्रकाश पुप्पालवार नायब तहसिलदार, गजभिये मंडळ अधिकारी, आतला, रायल तलांडे तलाठी व वनकर कोतवाल आदी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक  मतदान मशीन गुप्त आणि सुरक्षित आहे. अशी माहिती यावेळी उपस्थित नागरिकांना देण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos