वनविकास महामंडळाच्या पथकाने अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर केली कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
वनविकास महामंडळाच्या पथकाने  आज १८ सप्टेंबर  रोजी सकाळी आठ वाजता भिसी गावालगत वन विकास महामंडळाच्या राखीव वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १७ मधील क्षेत्रातून अवैधरित्या  एम एच ३४ एफ  ९३०५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या साह्याने होत असलेल्या रेती तस्करीवर कारवाई केली आहे. 
ट्रॅक्टर मालक आरोपी  महेश नारायण रामटेके  रा. भीसी हा अवैद्यरित्या  रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच  वन अधिकाऱ्यांनी मोका स्थळी जाऊन ट्रॅक्टरला रेती सह जप्त केले. ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील कार्यालयात  तहसीलदार एस.एस. टिळक यांच्या सुपूर्द केले आहे.  संबंधित आरोपी वर  रीतसर  पुढील कार्यवाही   तहसीलदार  नागटिळक  व वनाधिकारी करीत  आहेत.  चिमूर क्षेत्रात वन विकास महामंडळाच्या पथकाने केलेल्या कार्यवाही मुळे अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांमध्ये  दहशत निर्माण झाली आहे. 
 सदर कार्यवाही पश्चिम चांदा वन प्रकल्प विभाग चंद्रपूर वनविकास महामंडळाचे विभागीय वनाधिकारी  मोरे ,  सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम  यांच्या मार्गदर्शनाखाली खडसंगी वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी गाडेकर तसेच वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया,   क्षेत्रसाहयक  ए .जी. बायस्कर भीसी, वनरक्षक  आर.पी. अगोसे ,  वनरक्षक  के बी चव्हाण ,  वनमजूर  गोटे,  पातुरकर व इतर अधिकाऱ्यांनी  केली आहे. 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-18


Related Photos