महत्वाच्या बातम्या

 भाजपा महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीची शक्तीवंदन अभियानांतर्गत नियोजनात्मक बैठक संपन्न


- आरमोरी विधानसभा क्षेत्रातील वडसा येथे बैठकीचे नियोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलावर्गाचे आयुष्य सुकर, सुरक्षित आणि सुसंपन्न करण्याचे उद्दीष्ट बाळगून केंद्र सरकार विविध अभियान राबवित आहे. प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रातील वडसा येथे भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीता पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.गिता हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीवंदन नियोजनात्मक बैठक पार पडली.

यावेळी अर्चना ढोरे, रूपालि कावळे, रोशनी पारधी, जयश्री मडावी व महिला आघाडी तालुका अध्यक्ष, तालुका महामंत्री, आरमोरी विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos