महत्वाच्या बातम्या

 राज्यात कायम विनाअनुदानित २६६ नवीन महाविद्यालये होणार सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : वाढत्या लोकसंख्येनुसार मनुष्याच्या मूलभूत सोई, सुविधांसह शैक्षणिक गरजा देखील वाढत आहे. त्याअनुषंगाने यंदा राज्यात कायम विनाअनुदानित २६६ महाविद्यालयांची मागणी असून शासनाने ईरादापत्र मागविले आहे.

यात सर्वाधिक ८२ महिला महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे वास्तव आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ आणि शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी ईरादापत्र मिळण्याबाबत प्रस्ताव शासन मान्यतेच्या शिफारसीसाठी पाठविले आहे. विद्यापीठांकडून प्राप्त प्रस्तावांची शासनस्तरावर ईरादापत्र देण्याविषयी निकषांनुसार तपासणी करण्यात आली आहे. अटी व शर्तीनुसार शासनाच्या प्रचलित धोरणाची अंमलबजावणी करून नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी ईरादापत्र हे कायम विनाअनुदानित तत्त्वावर महाविद्यालय सुरू करण्यासाठी राहणार असल्याची बाब राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केली आहे. 

शासनाकडून नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी देण्यात येणारे ईरादापत्र हे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वैध राहील. यूजीसी निकषानुसार महाविद्यालयात उपलब्ध सोयी-सुविधांसह दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सोयी-सुविधांची खातरजमा करावी लागेल.

नवीन महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावात सर्वाधिक ८२ महिला महाविद्यालये असून मुंबई येथील श्रीमती नाथीबाई ठाकरसी दामोदर महिला विद्यापीठाला शासनाकडे तसा अहवाल पाठवावा लागणार आहे.

शासन मान्यतेच्या शिफारसीसाठी विद्यापीठनिहाय नवीन कॉलेजचे प्रस्ताव : 
- मुंबई विद्यापीठ, मुंबई : १४- श्रीमती नाथीबाई ठाकरसी दामोदर महिला विद्यापीठ, मुंबई: ८२
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ५९
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : १०
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : ५
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : १३
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर : ११
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : ३१
- कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव: १६
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड : २०
- गोंडवाना विद्यापीठ, चंद्रपूर : ५





  Print






News - Rajy




Related Photos