आपले सरकार सेवा केंद्र चालकांची पोलिसांमार्फत चारीत्र्य पडताळणी होणार


- सामान्य प्रशासन विभागाने दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
स्वच्छ प्रतिमा असलेले व सामाजिक स्वकारार्हता असलेले व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याच्या प्रक्रियेत यावे याकरीता सध्या कार्यरत असलेल्या व यानंतर नव्याने परवानगी दिल्या जाणाऱ्या सर्व काॅमन सर्विस सेंटर आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकांची पोलिसांमार्फत चारीत्र्य पडताळणी करावी, अशा सुचना सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने १९ जानेवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या योजने अंतर्गत राज्यभरात आपले सरकार सेवा केंद्र नागरीकांना शासकीय तसेच इतर खासगी सेवांचा लाभ पारदर्शकरीत्या व वेळेवर देत आहेत. ही केंद्रे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम राबवित आहेत. तसेच आपले सरकार सेवा केंद्र नागरीकांना ई - सेवांचा अधिक प्रमाणात वापर करण्यास व नागरीकांच्या डिजीटल सशक्तीकरणासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. म्हणूनच पारदर्शक कारभाराची प्रणाली तयार करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांना माहिती तंत्रज्ञानाचे एक सामान्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही केंद्र महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.
२०१५ पासून काॅमन सर्विस सेंटर हे आपले सरकार सेवा केंद्र या काॅमन ब्रॅडींग अंतर्गत कार्यरत आहेत. नागरीकांना विविध ई - सेवा पारदर्शकरीत्या व विहित मुदतीत मिळाव्यात यासाठी सर्व जुने आणि नवीन आपले सरकार केंद्र चालकांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची आवश्यकता असल्याबाबत केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स  आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने १ ऑगस्ट रोजी सुचना दिल्या आहेत. स्वच्छ प्रतिमा आणि सामाजिक स्वीकारार्हता असलेल्या व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याच्या प्रक्रियेत यावे याकरीता सर्व काॅमन सर्विस सेंटर आणि आपले सरकार केंद्र चालकांची चारीत्र्य पडताळणी पोलिसांमार्फत १५ ऑक्टोबर पर्यंत करावी, अशा सुचना सामान्य प्रशासन विभागाने ११ सप्टेंबर रोजी च्या शासन निर्णयान्वये दिली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-18


Related Photos