त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तान जन्मालाच आला नसता : उद्धव ठाकरे


वृत्तसंस्था / मुंबई :  त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता  असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 
 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.   
‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उद्धव ठाकरे बोलत होते.  “आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे. आम्ही महात्मा गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेले कार्य नाकारत नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.
“देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सागू इच्छीतो की सावरकर यांनी १४ वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे आणि त्यांनी मरणयातनादेखील भोगल्या आहेत. जर नेहरूंनी अशा यातना भोगल्या असत्या आणि ते १४ मिनिटांसाठी जरी तुरूंगात गेले असते तरी त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती,” असंही ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. तसंच त्यांना या पुस्तकाची प्रत दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-18


Related Photos