महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : तालुक्यातील सिंगणपेठ येथील सम्राट क्रिकेट क्लब सिंगणपेठ द्वारे आयोजित भव्य ग्रामीण ३० यार्ड क्रिकेट सामन्यांचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनाली कंकडलवार यांच्या कडून देण्यात येत आहे. तसेच तृतीय पारितोषिक तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर यांच्या कडून देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त साहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस-आविसं नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम होते.

यावेळी उदघाटन प्रसंगी माजी सरपंच प्रमोद आत्राम, ग्रामपंचायत सदस्य कालिदास कुसनाके कोठारी, राजेश दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव, ग्रामपंचायत चुटूगुंटा उपसरपंच सुरेश आत्राम, तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर, ईश्वर उरेते, पो.पा. अरविंद निखाडे, पो.पा. मीना वाघमारे, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम, दिवाकर आलाम, सतीश निखाडे, कार्तिक डोके, साईनाथ डोके, अजय निखाडे, रोशन तलांडे, धीरज तलांडे, राहुल आत्राम, रोहन आत्राम, महेश डोके, अक्षय पाल, गंगाराम करमे, दीपक आत्राम, ऋतिक तलांडे, मनोज बोरकुटे, कैलास तलांडे, स्वप्नील डोके, प्रतिष्ठित नागरिक सोमाजी बोरकुठे, अमृता वाघमारे, नंदा निखाडे, प्रेमिला तलांडे, वनमाला आत्राम, सचिन पांचार्या, प्रमोद गोडशेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos