दारू तस्करीप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
 दारू तस्करीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. जयस्वाल यांच्यासह अन्य दोन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक दीपक जयस्वाल यांच्या घरापुढे असलेल्या एका कारमध्ये देशी-विदेशी दारूच्या पेट्या पोलिसांना सापडल्या आहेत. या दारूची किंमत साडेपाच लाखांवर असल्याचं पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी जयस्वाल यांच्यासह दोघांना अटक केली. या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याला अटक झाल्यानं पक्षाची प्रतिमा मालिन झाली असून, काही सामाजिक संघटनांनी जयस्वाल यांच्यावर तडीपारीच्या कारवाई करण्याची मागणी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-17


Related Photos