महत्वाच्या बातम्या

 महाग्रामसभा तालुका कोरचीची कार्यकारिणी गठीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : तालुका मुख्यालयत 1/10/2022 रोज शनिवारला दुपारी 1.30 वाजता गोटुलभुमी टि पाईंट खुणाराच्या भव्य पटांगणात बिरसुजी कमरो यांचे अध्यक्षतेखाली महाग्रामसभा तालुका कोरचीच्या नविन कार्यकारिणी गठीत करण्यात आले. 

वनहक्क कायदा 2006, नियम 2008, व सुधारणा 2012 अंतर्गत कोरची तालुक्यातील 72 ग्रामसभांचे (महासंघ )महाग्रामसभा तालुका कोरचीच्या कार्यकारिणी दर तीन वर्षांनी बदलण्याची नियम संघटन तयार करण्याआधी ठरविल्यानुसार आज नवनियुक्त कार्यकारिणी गठीत झाली. हि कार्यकारिणी तयार करण्यासाठी एक महिना आधीच नोटीस महाग्रामसभा क्लास्टर यांना व क्लास्टर यांनी ग्रामसभांना सुचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामसभांनी आप आपल्या ग्रामसभा घेऊन दोन महिला व दोन पुरुष सदस्य यांची ठरावानिशी नेमणुका करुन क्लासटर मध्ये पाठविले. क्लासटर मधुन निवड झालेल्या सद्सयांमधुन एक महिला व पुरुष  प्रतिनिधी म्हणून ठरावानिशी महाग्रासभेत निवड केले गेले. त्यात 72 गावांचे सात क्लास्टर पाडले गेले आहेत. सात क्लास्टर आणि प्रति क्लास्टर प्रमाणे एक महिला आणि एक पुरुष असे एकुण चोदा सदस्य व तालुक्यातील अपंग प्रतिनिधी म्हणून दोन प्रतिनिधी म्हणजे एकुण सोळा सभासद असलेली महाग्रामसभा तालुका कोरची ची  खालीलप्रमाणे कार्यकारिणी गठीत झाली. 

अध्यक्ष :  राजाराम सत्तर नैताम. 

उपाध्यक्ष : सौ. रत्नामाला चिंतामण सहारे. 

सचिव : सौ. कुमारीबाई दशरथ जमकातन 

सहसचिव : विश्वनाथ आसाराम हलामी. 

कोषध्यक्ष : रायसिगं मन्नुराम हलामी. 

सदस्य : सितल दुर्गू नैताम 

सदस्य : पवन संताराम कोराम 

सदस्य : रुपेश सुरजु कुमरे 

सदस्य : अशोक गावतुरे 

सदस्य : गणेश गावळे 

सदस्य : सुनिल बुकाऊ होळी अपंग संघटना सदस्य. 

सदस्या : सौ. राधिका वासुदेव गावळे. 

सदस्या : सौ. कविता कार्तिक रक्षा 

सदस्या : सौ. नलिनी नरेश सिंद्राम 

सदस्या : सौ. शांतीबाई नैताम. 

अशाप्रकारे महाग्रामसभा तालुका कोरचीच्या मासिक बैठकीत कार्यकारिणी सर्वसहमतीने नियुक्त करण्यात आले. महाग्रामसभा तालुका कोरचीची संघटना चालविण्यासाठी खालीलप्रमाणे सल्लागार व्यक्ती आणि मित्र संस्था यांनाही घेण्यात आलेले आहेत. 

(1) झाडुराम जंगलु हलामी माजी अध्यक्ष योग्य न्याय व सल्लागार सदस्य. 

(2) इजामसाय सन्नु काटेंगे कायदेविषयक व दस्तावेज मार्गदर्शक सल्लागार सदस्य. 

(3) सौ. कल्पना नैताम वन हक्क महिला अधिकार मार्गदर्शक सदस्यां 

(4) मुन्ना उईके रोहयो प्रशिक्षक सदस्य 

(5) मदन पोरेटी रेकाँर्ड प्रशिक्षक.

(6) धनिराम हिडामी विकलांग अधिकार. 

(7) सुनिल  वादीजी मडावी अकरा गाव ईलाखा न्याय भुमिया सल्लागार सदस्य. 

(8) राष्ट्रपाल नखाते प्रसिद्धी पत्रकार. 

(9) नंदकिशोर वैरागडे प्रसिद्धी पत्रकार. 

(10) श्रावण ताराम साहेंब अँड. कायदेविषयक सल्ला.

(11) आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा, कोरची मित्र संस्था सल्लागार. 

(12) सृष्टी सामाजिक संस्था सल्लागार. 

(13) वृक्ष मित्र सामाजिक संस्था सल्लागार. 

अशाप्रकारे योग्य सल्ला व मार्गदर्शन करुन कोरची तालुक्यातील ग्रामसभांचे संघटन असलेली महाग्रामसभा सक्षम रित्या ग्रामसभांना मार्गदर्शन करण्याकरिता नविन पिढीची कार्यकारिणी गठीत झालेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos