ॲनिमिया व कुपोषण मुक्तीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : डॉ.विजय राठोड


- अनिमिया आणि कुपोषण मुक्तीसाठीचा पोषण वॉक यशस्वी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 युवा पिढीने गडचिरोली जिल्हा ॲनिमिया मुक्त व कुपोषण मुक्त करण्यासाठी  हातभार लावून देशाला सुद्रूढ बनविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी  केले. 
जिल्ह्यातील पोषण अभियानाचा एक भाग म्हणून आणि कुपोषणमुक्त व ॲनिमिया मुक्त गडचिरोलीचा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी जनजागृतीपर पोषण वॉक आयोजित करण्यात आला होता.  यावेळी अतिरीक्त पोलीस अधिक्षक डॉ.मोहित गर्ग उपस्थित होते. 
केंद्र शासनातर्फे समग्र पोषणावर आधारित  पोषण अभियान कार्यक्रम चालवला जात आहे. त्यामध्ये सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा केला जातोय. यात संपूर्ण महिन्याभरात अंगणवाडी, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन, समाजात आरोग्य व योग्य पोषणाबाबत जाणीवजागृती करणे, अभियानात लोकांचा सहभाग वाढवणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गांधी चौकातून पोषण वॉक ची सुरुवात सकाळी ८:३० वा.  झाली. महिला रुग्णालयातील स्तनदा माता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरवात केली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल विकास ए. आर. लामतुरे,  जिल्हा परिषदेचे माध्य.शिक्षणाधिकारी राजकुमार निकम,  कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग घोडमारे,  आरोग्य विभागाचे डॉ सुनील मडावी, डॉ. विनोद मशाखेत्री, डॉ. इंगळे,  इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष  डॉ. कुंभारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, प्रधानमंत्री फेलो सुधाकर गवंडगावे व बद्रीनाथ गणपती, टाटा ट्रस्टचे डॉ. भिसे व आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे प्रतिनिधी, बाल विकास प्रकल्प अधिकारी,  नागरी व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, जिल्हा नियोजन विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, कृषी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालय, महिला महाविद्यालय,  समाजकार्य महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिवाजी हॉयस्कूल, जिल्हा परिषद हॉयस्कूल यांचे प्राचार्य व प्राध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह  सहभागी झाले होते. 
                 सदर पोषण वॉक चा समारोप   कृषी महाविद्यालय , गडचिरोली येथे करण्यात आला.  समारोप प्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे जगदिश मेश्राम यांनी पोषण वॉक मध्ये सहभागी झालेल्यांना पोषणाची  शपथ दिली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-17


Related Photos