रमाई आवास योजना (ग्रामीण) मधील घरकुलाची यादी जाहिर, ११६१ लाभार्थी पात्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली  : 
 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी पक्की घरे बांधून देण्याकरिता रमाई आवास योजना (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने  घरकुल निर्माण समिती, गडचिरोली द्वारा प्राप्त प्रस्तावातुन ११६१ पात्र लाभार्थी यादीस मंजुरी दिली आहे. 
पात्र - अपात्र लाभार्थी यादी ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र लाभार्थी यादीत नाव असल्याबाबत लाभार्थ्यांनी ग्रापंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात यादी पाहून खात्री करावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरजुंनी घरकुल मिळण्यास्तव त्यांच्या ग्रामपंचायत  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.योजनेचे निकष पूर्ण करीत असलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाला सादर करावेत, असे आवाहन  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांना   केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-16


Related Photos