आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष , टीडीपीचे ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांची आत्महत्या


वृत्तसंस्था / हैदराबाद : आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांनी आज १६ सप्टेंबर रोजी  राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे . 
कोडेला हे सहा वेळा खासदार होते आणि विभाजनानंतर आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९८५ मध्ये माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीही होते. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यानंतर कोडेला यांचे पुत्र आणि कन्येविरुद्ध भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असताना विधानसभेच्या सभागृहातील टेबल-खुर्च्या आपल्या मुलाच्या शोरुममध्ये पोहोचवण्याचा कोडेला यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कोडेला शिव प्रसाद राव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. आपण राव कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.
  Print


News - World | Posted : 2019-09-16


Related Photos