काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं, प्रत्येकी १२५ जागा लढवणार


-  ३८ जागा मित्र पक्षांना 
वृत्तसंस्था /  मुंबई :
  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं असून  आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार आहेत. तर, मित्र पक्षांना ३८ जागा सोडण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण प्रभाव झालेल्या  काँग्रेस - राष्ट्रवादीला  पक्षांतराचा मोठा फटका बसला आहे. या सर्व घडामोडीतून सावरत  दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.   निम्म्या-निम्म्या जागा लढण्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं एकमत झालं आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनीही त्यास दुजोरा दिला. पाच ते सात जागांची अदलाबदल करण्यात येणार असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असंही मलिक यांनी सांगितलं.

   Print


News - Rajy | Posted : 2019-09-16


Related Photos