महत्वाच्या बातम्या

 शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालये राहतील जबाबदार : डॉ. सिद्धार्थ गायकवाड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ऑनलाइन अर्ज करूनही नागपूर विभागातील ३२ हजार ५७३ इतक्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज अद्याप सादर केलेले नसून १९ हजार ७९६ इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत समाज कल्याण विभागाने सबंधितांना वारंवार सुचित केले आहे. समाज कल्याण विभागाने आता अशा महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा दिला आहे. ज्या महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी दिली आहे. अन्यथा अशा महाविद्यालयांवर कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडुन संयुक्तपणे भारत सरकार मॉट्रीकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. सदर महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी अनु.जाती प्रवर्गासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सन २०२३ -२४ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द संर्वगाचे १२ फेब्रुवारी २०२४ अखेर ५२ हजार ६२२ अर्जांची ऑनलाईन नोदणी झाली आहे. त्यापैकी समाज कल्याण विभागाने २७ हजार ६२० अर्ज मंजूर केले आहेत. १९ हजार ७९६ इतके अर्ज महाविद्यालयाकडेच प्रलबित असल्याने त्यावर समाज कल्याण विभागास कार्यवाही करता आली नाही. तसेच ३ हजार ६९० विद्यार्थ्यांनी महविद्यालयाकडे त्रुटीपुर्तता करून अर्ज सादर केले नाहीत. सन २०२२-२३ मध्ये नागपूर विभागात एकुण ८५ हजार १९५ इतक्या विद्यार्थाना शिष्यवृती प्रदान करण्यात आली होती. त्यापैकी १२ फेब्रुवारी २०२४ अखेर फक्त ५२ हजार ६२२ अर्जांची नोंदणी म्हणजेच फक्त ६१ % अर्जांचीच ऑनलाईन नोंदणी झाली आहे. नागपूर विभागातील महाविद्यालय स्तरावर अनुक्रमे नागपूर १० हजार २८६ अर्ज, वर्धा २ हजार ३७२, भंडारा  हजार २७३, गोंदिया १ हजार ३२०, चंद्रपूर २ हजार ९१७ तर गडचिरोली ६२८ असे एकूण १९ हजार ७९६ इतके अर्ज प्रलंबित आहेत.

सन २०२३-२४ या वर्षात महाविद्यालयामंध्ये प्रवेश घेतेलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos