आदिवासी महिलेवर अत्याचार, शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी : 
आदिवसी महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन  दत्तात्रय बादशहा वाळे (५२) याच्याविरुद्ध  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 
कोपरगांव  तालुक्यातील शहापुर येथे राहणाऱ्या या गरीब अत्याचारित महिलेने पोलीसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,माझे लग्न झाले असुन मला दोन मुलं आहेत. मुलांसह मी विभक्त राहाते.  संगमनेर तालुक्यातील मंगळापुर येथिल दत्तात्रय वाळे याने मला एक गुंठा जागा घेऊन देतो व घरही बांधुन देतो,तसेच तुझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतो,असे आमिष दाखवून माझ्यावर वेळोवेळी,ठिकठिकाणी अत्याचार केले. अत्याचारास  विरोध केला असता मारहाणही केली असल्याची फिर्याद शिर्डी पोलीसात दाखल केली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा व ॲट्रासीटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार संघटनेचे अध्यक्ष अनिल गांगुर्डे, ,एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश औताडे  यांनी डि.वाय.एसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या निदर्शनास आणुन दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. शिर्डी पोलीसांनी कारवाई सुरु करुन,ज्या हाॅटेलमध्ये अत्याचार झाला, त्या हाॅटेलची तपासणी करुन हाॅटेलचे रजिस्टर ताब्यात घेतले. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार संघटनेचे अध्यक्ष अनिल गांगुर्डे यांनी पिडीत महिलेस धीर दिला.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-15


Related Photos