अशोक नेते व सुनील मेंढे यांच्याविरूद्धच्या याचिकांवर सुनावणी सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली व चिमूरचे खासदार अशोक नेते व भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, कारू नान्हे यांना १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा वेळ देण्यात आला आहे.
सदर याचिकेतून मुख्य निवडणूक आयोगाला वगळण्याकरिता आयोगाने अर्ज दाखल केला आहे. तर डॉ. गजबे व नान्हे यांनी आयोगाला याचिकेतून वगळण्याबाबात उत्तर दाखल करण्याकरिता १६ सप्टेंबरपर्यंतचा त अवधी मागितला आहे. खा. नेते व मेंढे यांचे वकील सुनील मनोहर यांनी लेखी उत्तर दाखल करण्याकरिता कालवधी मागितला होता. दरम्यान, विजयी खासदारांविरुद्ध दाखल याचिकांवर २३ जुलै रोजी न्या. रोहित देव यांनी मुख्य निवडणूक आयोग तसेच अशोक नेते व सुनील मेंढे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-09-15


Related Photos