डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
  डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती व आर्य वैश्य कोमटी समाज तर्फे भामरागड तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत किटचे वाटप व आरोग्य तपासणी ,औषधी वाटप करण्यात आले. 
 गेल्या महिन्याभरात भामरागड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी घरात, दुकानात घुसल्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. तालुक्यातील पुरबाधित गावातील नुकसांनग्रस्तांना काल १३ सप्टेंबर रोजी  डॉ.  हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर व आर्य वैश्य कोमटी समाज गडचिरोली तर्फे ७०० मदत किटचे वाटप व आरोग्य  तपासणी व औषध वितरण  करण्यात आले.
 भामरागड तालुक्यात यावर्षी १९९४ नंतरचा सर्वाधिक पाऊस झाल्याने हाहाकार उडाला होता. आठवडाभर पावसाच्या पाण्यात राहिल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. ही बाब समितीच्या सदस्यांना माहिती होताच  मदत गोळा केली. यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ आदींचा समावेश आहे.   समितीच्या कार्यकर्त्यांनी ७०० मदत किट भामरागड, कृष्णार, आरेवाड़ा, कारंमपल्ली, फुलणार, मिरगुडवचा, पोयरकोठी, गुंडेसुर, हिणभट्टी, कोरपरसी, गुंडूरवाही, गुंडेनूर, जुवी, हलवेर, कियर, पल्ली आदी  गावांतील नुकसानग्रस्तांना दिले.  
यासोबतच ताडगाव, कारंमपल्ली, हिदूर या गावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील डॉ. प्रवीण येरमे,  डॉ.निखिल भागवत, डॉ.के.एल.रॉय यांनी २५० रुगणाची आरोग्य तपासणी करून  औषध वाटप केले. या सर्व कार्यक्रमात डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर चे पदाधिकारी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी, आलापल्ली व भामरागड येथिल स्थानिक कार्यकर्त्यांनी  सहभाग घेतला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-14


Related Photos