देसाईगंज स्थानकावर थांबली दरभंगा एक्सप्रेस


- खा. अशोक  नेते व आ. कृष्णा गजबे तसेच  नागरिकांच्या  प्रयत्नाला यश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज  :
सिकंदराबाद-दरभंगा (१७००८) ही एक्सप्रेस देसाईगंज येथील रेल्वेस्थानकावर आज १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी  पोहचली व आमदार कृष्णा गजबे यांनी दरभंगा एक्सप्रेसच्या   चालकाचे स्वागत केले.
 सदर एक्सप्रेस देसाईगंज येथे थांबत असल्याने प्रवाशांसाठी सोयीचे होणार आहे.  सिकंदराबाद - दरभंगा एक्सप्रेस गोंदिया - बल्लारशहा मार्गे जाते. सदर एक्सप्रेसला देसाईगंज येथे थांबा देण्यात यावा,अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने केली जात होती.  आ. कृष्णा गजबे यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर  केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष  गोयल यांनी दखल घेतली व  आज १४ सप्टेंबर पासून दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस(१७००८) बुधवार व शनिवारला दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी पोहचणार आहे.
तर सिकंदराबाद-दरभंगा(१७००७) ही एक्सप्रेस रविवार व बुधवार देसाईगंज रेल्वेस्थानकावर सकाळी ७.१७ ला पोहचेल .  एक्सप्रेस थांबत असल्यामुळे आता प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आ.कृष्णा गजबे यांचे आभार मानले. 
 दरभंगा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी आ.कृष्णा गजबे यांच्या सह  खा अशोक  नेते यांनी रेल्वे मंत्रालयात ही बाब निदर्शनास आणून निवेदन दिले होते..
 स्वागतप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे, माजी भाजप जिल्हा अध्यक्ष नगरसेवक किसन  नागदेवे, देसाईगंज न.प नगराध्यक्षा शालुताई दंडवते, भाजप तालुका अध्यक्ष राजाभाऊ जेठाणी,नगरसेवक सचिन  खरकाटे,संतू शामदासनी,प.स उपसभापती गोपाल उईके, माजी नगराध्यक्ष जेसामल  मोटवाणी, भाजप शहर महामंत्री सचिन  वानखेडे, तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-14


Related Photos