बनावट दारूच्या कारखान्यावर गोंदिया गुन्हे शाखेची धाड, लाखोंचा माल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया  :
येथे बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर गोंदिया गुन्हे शाखेने धाड टाकली आहे. यावेळी बनावटी दारू तयार करण्याचा साठा जप्त करण्यात आला. ही बनावटी देशी दारू बंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील दारूच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगार शाम चाचेरे उर्फ पिटी हा काही दिवसांपासुन रूम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी केमिकलचा वापर करून बनावट देशी दारू बनवत होता. ही दारु तो दारूबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली. दरम्यान गुन्हे शाखेने हरसिंगटोला-रतणारा येथील फार्म हाऊसवर मध्य रात्री धाड मारली. यात बनावटी देशी दारू तयार करण्याचे लाखोंचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या बनावटी देशी दारूच्या कारखान्यात धाड टाकली असता या ठिकाणी ३ लाख २८ हजार १२० रुपये किमतीचे बनावटी देशी दारूचे १३२ बॉक्स, तसेच २ लाख २५ हजार रुपये किमतीचे ७८० लिटर बनावट देशी दारू तयार करण्याचे केमिकल आणि इतर साहित्य आढळले. ६ लाख ५८ हजार ६२० रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात दवनीवाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-09-14


Related Photos