वर्धा येथे कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्ह्यातील  पुलगाव येथील नाचणगाव मार्गावरील बालाजी मंदिरासमोरील अशोक नगर परिसरात पत्नीची धारदार शस्त्रांनी वार अरुण पतीने हत्या केली. या घटनेप्रकरणी पतीला अटक करण्यात आली. १३ सप्टेंबरच्या पहाटे ही खळबळजनक घटना उघडकीस आली. घरगुती वादातून ही हत्या झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मृत महिलेचे नाव वैशाली संतोष चाडगे (४०) असे आहे. अशोकनगर येथील संतोष रामभाऊ चाडगे याने पत्नीची चाकूने गळ्यावर वार करत हत्या केली. घटनेच्यावेळी दोन्ही मुले झोपलेली होती. पती काम करीत नसल्याने दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. वाद झाल्यानंतर अनेकदा मारहाणही होत होती. घटनेच्या एक दिवसापूर्वीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
घटनेच्या रात्री सगळेजण झोपल्यानंतर संतोषने पत्नी वैशालीची गळा चिरून हत्या केली. सकाळी चार वाजताच्या सुमारास आरोपीने स्वतः पत्नीची हत्या केल्याची माहिती मुलाला दिली. मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून संतोष चाडगेला अटक केली आहे. पुढील तपास पुलंगाव पोलीस करत आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-09-14


Related Photos