महत्वाच्या बातम्या

 कामगार विभागामार्फत तालुकास्तरावर देण्यात येतील सेवा व सुविधा


- कामगारांच्या सोयीसाठी तालुका निहाय दिवसाचे वेळापत्रक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र, भंडारा मार्फत कामगारांना सेवा सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा स्तरावर एकच कार्यालय उपलब्ध आहे. सध्या या केंद्रावर होत असलेली गर्दी पहाता कामगारांना सोईस्कर होण्यासाठी तालुकानिहाय दिवस ठरविण्यात आलेले आहेत.

जिल्हा कामगार सुविधा केंद्र, भंडारा कार्यालयाकडून मंजुर झालेल्या नोंदणीचे/नुतनीकरणाचे कार्ड व पावती घेण्याकरिता भंडारा तालुक्यासाठी सोमवार, लाखनी तालुक्यासाठी मंगळवार साकोली लाखांदूर साठी बुधवार पवनीसाठी गुरुवार तर तुमसर व मोहाडीसाठी शुक्रवार या दिवशी तालुकास्तरावर कामगारांना जिल्हा कामगार सुविधा केंद्राकडून मंजूर झालेले कार्ड व पावती वाटपासाठीचे दिवस दिले आहेत.

ज्या नोंदित सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांनी शिष्यवृत्ती चे अर्ज ऑनलाईनरित्या सादर केलेले आहेत. त्या अर्जाची पडताळणी आपणांस दिलेल्या तारखेनुसार सर्व तालुक्यातील कामगारांसाठी सुरु राहील.असे उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, तथा सरकारी कामगार अधिकारी, भंडारा यांनी कळवले आहे.  





  Print






News - Bhandara




Related Photos