चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्र्पुर :
जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतंर्गत येणाऱ्या वाढोणा येथे बिबट मृतावस्थेत आढळून आला आहे.या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
सदर बिबट नर असून ४ वर्ष वय आहे . माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आभिलाशा सोनटक्के यांनी ताफ्यासह घटनास्थळाला भेट दिली व चौकशी केली असता बिबटयाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले. त्यानंतर सावरगाव रोपवाटिकेत या मृत बिबटयाचे डाँ.गिरीष गभणे व शिरिष रामटेके यांनी शवविच्छेदन केले. बिबट्याचा मृत्यू हा आजाराने झाला असल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदन केल्यानंतर डाँ.गिरीष गभणे यांनी दिली असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी दिली.
दरम्यान  बिबटयाच्या अवयवांचे नमुणे घेण्यात आले असून त्यांची फाँरेंसिक लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-14


Related Photos