हिंगणा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार घोटमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असतानाच, आज राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जोरदार दणका दिला. पक्षाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राज्यात विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. त्याआधीच राज्यातील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. तर काही नेत्यांनी मनगटावर 'शिवबंधन' बांधलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. एकापाठोपाठ एक हादरे बसत असतानाच, राष्ट्रवादीनेही भाजपला जोरदार झटका दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तेथे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेऊन पक्षप्रवेश केला. यावेळी माजी मंत्री रमेश बंब, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजू राऊत, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते.

   Print


News - Rajy | Posted : 2019-09-14


Related Photos