मध्यरात्री एकच्या सुमारास उदयन राजे भोसले यांचा खासदार पदाचा राजीनामा, आज भाजप प्रवेश


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  साताराचे खासदार उदयन राजे भोसले यांनी  मध्यरात्री एक वाजताच्या  सुमारास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे.  यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन   उपस्थित होते. सातारा येथील लोकसभेची निवडणूक आता विधानसभेसोबत होते, की नंतर याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल 
यंदाची लोकसभा निवडणूक उदयनराजे यांनी जिंकून राष्ट्रवादीला आधार दिला. मात्र, त्यानंतर सातारचे त्यांचे चुलत बंधू व राजकीय विरोधक आ. शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले. रामराजे नाईक निंबाळकर हे उदयनराजे यांचे विरोधकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 
लोकसभेत तीनदा लोकप्रतिनिधित्व करणारे उदयनराजे यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी कधीच पटले नाही. उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील कलगीतुरा चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकमात्र अपवाद वगळता स्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे कधी जमलेच नाही. राज्यात सन १९९५ च्या युतीच्या राजवटीत दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनानुसार उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना महसूल राज्यमंत्री करण्यात आले होते. सातारचे राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद लेवे हत्या प्रकरणात ते अनेक दिवस अडकले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावेळी उदयनराजे यांचा पश्चिम महाराष्ट्रात फायदा होण्याऐवजी राजकीय उपद्रव वाढल्यामुळे भाजपने त्यांना दूर लोटले होते.  Print


News - World | Posted : 2019-09-14


Related Photos