महत्वाच्या बातम्या

 आयटीआय पास उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता तालुकास्तरावर पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास आयटीआय पास असलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१४ फेब्रुवारी रोजी हिंगणघाट १५ फेब्रुवारी रोजी समुद्रपूर येथे आयोजित मेळाव्यात संसुर श्रृष्टी  इंडिया कंपनी हिंगणघाट, नुबेनो हेल्थकेअर  प्रा. लि. नागपूर सहभागी होणार असून त्यांच्या कडे रिक्त असलेली १५० पदाच्या पदभरतीसाठी इयत्ता १० वी पास च्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तसेच हेलिकेल स्प्रींग प्रा.लि. संभाजीनगर, नवभारत फर्टीलाईजर, नवकिसान कंपनी, एसएसएच फार्म्युलेशन कंपनी हिंगणघाट यांच्याकडे असलेली आयटीपास व पॉलीटेक्नीक पास उमेदवारांसाठी पदभरती करीता निवड करण्यात येणार आहे.   

१६ फेब्रुवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा येथे आयोजित मेळाव्यात सुझुकी मोटर्स गुजरात यांच्याकडे असलेल्या ८०० आयटीआय पास उमेदवारांची ट्रेड निहाय जागा भरल्या जाणार आहे.

याकरीता फिटर, ईलेक्ट्रिशियन, वेल्डर, डिझेल मॅकेनिक, मोटर मॅकेनिक, मशिनिष्ट, टुल ॲन्ड मेकर, पीपीओ, पेंटर जनरल, ट्रॅक्टर मॅकेनिक, सीओई ऑटो, वायरमन, ईलेक्टॉनिक्स, शिटमेकर वर्कर इत्यादी पदाच्या भरतीकरीता प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची वय १८ ते २६ वर्ष असावे.

उमेदवारांनी मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेचे मुळ प्रमाणपत्र व एम्लायमेंट कार्ड घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos