विधानसभा निवडणूक २०१९ : प्रशासन सज्ज, ९३० मतदान केंद्र, ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार


- जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची पत्रकार परिषदेतून माहिती
- निवडणूक अधिकारी नेमले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. नुकतेच ३१ ऑगस्ट रोजी अंतीम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीनुसार तिन्ही विधानसभा क्षेत्रात एकूण ७  लाख ७४ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कल्पना निठ - ठुबे, तहसीलदार चडगुलवार, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसड उपस्थित होते.
पुढे माहिती देताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, जिल्ह्यातील तिनही विधानसभा निवडणूकीसाठी एकूण ९३० मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांवरून ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार मतदान करतील. यामध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रात १  लाख १९ हजार ४९७ पुरूष आणि १ लाख १६  हजार ७०९ महिला मतदारांचा समावेश आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात १  लाख २७ हजार ७४५ पुरूष आणि १  लाख २५ हजार २८८ महिला मतदारांचा समावेश आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १  लाख ४५ हजार ७४६ पुरूष आणि १ लाख ३९ हजार ९६१ महिला मतदारांचा सहभाग आहे. तिन्ही विधानसभा क्षेत्रात ३ लाख ९२ हजार ९८८ पुरूष तर ३  लाख ८१ हजार ९५८ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नवीन मतदार यादीनुसार २  हजार ३० नवमतदारांची वाढ झाली आहे. तर ९२६ मृत मतदारांचे नाव कमी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. 
विधानसभा निवडणूकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहीता लागू होउ शकते. यामुळे निवडणूकीची तयारी करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक बुथवर जनजागृती केली जाणार आहे. आदर्श आचारसंहीतेचे काटेकोपणे पालन व्हावे यासाठी विविध पथके तसेच टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे, अशीही माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-13


Related Photos