भंडारा येथील भुमी अभिलेख विभागातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
शेतीची मोजणी करून वेगवेगळे गट तयार करण्याकरीता ४ हजारांची लाच स्वीकारणारा भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
 नारायण चिंधुजी बलखंडे (४५) भुकरमापक, भुमी अभिलेख कार्यालय भंडारा  असे लाचखोराचे नाव आहे.  यातील तक्रारदार हे बोरगाव तह. जि. भंडारा येथील रहीवासी असुन तक्रारदार शेती व शिक्षण करतो. तक्रारदाराच्या आईच्या व मावशीच्या  नावे  बोरगाव येथे गट क्र. ३३३ ही २.५२ हेक्टर शेतजमीन आहे.   सदर शेतजमीनीची मोजणी करून वेग  वेगळे गट करण्याकरिता तक्रारदाराने भुमी अभिलेख कार्यालय भंडारा येथे अर्ज केला होता. सदर अर्जाबाबत तक्रारदाराने भुमी अभिलेख कार्यालय भंडारा येथे विचारपूस केली. तेथील कार्यरत भुकरमापक नारायण चिंधुजी बलखंडे  याला  भेटले असता त्याने  शेतजमीनीची मोजणी करून त्यांची वेगळे वेगळे गट तयार करण्यासाठी ५ हजार रूपये लाचेची मागणी केली.  याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथील पोलीस निरीक्षक  पुरूषोत्तम अहेरकर यांनी तक्रारदारास दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा करून भुमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांविरुद्ध योजनाबध्दरित्या आज १३ सप्टेंबर  रोजी सापळा रचला. भुकरमापक  नारायण चिंधुजी बलखंडे याने  ५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडअंती ४  हजार रूपये लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडले. भुकरमापक नारायण चिंधुजी बलखंडे याच्याविरूध्द पोलीस ठाणे भंडारा येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याच्या नागपूर येथील निवासस्थानाची  लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या चमुद्वारे  झडती सुरू आहे. 
सदर  कार्यवाही पोलीस अधीक्षक   रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलिस उपअधीक्षक महेश  चाटे, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पुरूष्षोत्तम अहेरकर , पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी,  पोहवा संजय कुरंजेकर, नापोशि पराग राऊत, सचिन हलमारे, कोमल बनकर, सुनिल उकरे यांनी केली आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-09-13






Related Photos