आमदार सुनिल केदार यांची भाजपा कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी


- नागपुरात राजकीय वातावरण तापले 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :   
सावनेर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार सुनिल केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची  धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनिल केदार यांच्या या व्हिडीओमुळे नागपूरमधील राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे.
 आमदार केदार  म्हणाले की, ‘जे कुणी भाजपाचा झेंडा घेऊन फिरतील त्यांना घरात घुसून मारू.’ केदार यांच्या या वक्तव्यानंतर सावनेरमध्ये तणावाचे वातावरण आहे. हा व्हिडीओ १२ तारखेच्या सभेमधील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आमदार केदार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप भाजपाचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे.
 सिलेवाडा येथे सिटी बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्यामुळे या वादाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर एका कार्यक्रमात केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली. या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-09-13


Related Photos