दंडाच्या रकमेचा विक्रम : ट्रकचालकाला तब्बल दोन लाख पाचशे रूपयांचा दंड!


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  दंडाच्या रकमेचा विक्रम मोडणारी घटना दिल्लीमध्ये  मुबारक चौकात  समोर आली असून एका ट्रक चालकाला वाहूकीचे नियम तोडल्यामुळे तब्बल दोन लाख पाचशे रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे चालान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.   राम किशन असे ट्रक चालकाचे नाव आहे. 
पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रक चालकाने अनेक नियमांचे उल्लघंन केले होते. त्यामुळे त्याच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकीच एक म्हणजे ओव्हरलोडींग होय.  यापूर्वी राज्यस्थानच्या वाहनचालकाला दिल्लीमध्ये एक लाख ४१ हजारांचा दंड ठोठावला होता. हे प्रकरण ताजे असतानाच दिल्लीमधील हे आणखी प्रकरण समोर आले आहे. या नव्या प्रकराचा सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.देशातील काही राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  Print


News - World | Posted : 2019-09-13


Related Photos