महत्वाच्या बातम्या

 आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी करण्याकरिता माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनाद्वारे मागणी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : आलापल्ली पासून १० की.मी. अंतरावर असलेल्या तलवाडा गावात आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी आलेली नाही व त्यामुळे संपर्क करण्याकरिता व इंटरनेट ची कामे करण्याकरिता अडचण होत आहे. त्यामुळे गावातील नागरीकांना तसेच कर्मचारी वृदांना मानसिक व शाररीक त्रास सहन करावा लागात आहे. बरेच दिवसांपासून टॉवर चे काम बहुतेक पूर्ण झालेले असून मशीन लावणे काम बाकी आहे.

त्यामुळे वैयक्ति पाठपुरावा करुन सदर अडचणीकडे लक्ष देवून आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, याकरिता गावकऱ्यांनी माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केले. 

यावेळी क्रिष्णा वेलादी, वासुदेव सिडाम, मासा वेलादी,  टिंकु सल्लाम, विठठल वगाडे, मंगु पोदाडी, संतोष आत्राम, अशोक तेलामी,  निजरना वेलादी, सुमन पोदाढी, दुर्गे, बिनता हलदर इ. शाळा व्यवस्थान समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos