आज गडचिरोलीत बाप्पांची मिरवणूक खड्ड्यांमधून निघणार!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील मुख्य मार्गांची अवस्था बकाल झाली आहे. चामोर्शी मार्ग तर रस्ताच नाहीसा झाल्याची स्थिती आहे. अशा बकाल झालेल्या खड्डेमय रस्त्यांवरून आज बाप्पांची मिरवणूक निघणार असून गणेशभक्तांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
मागील १० दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सव आज १२ सप्टेंबर रोजी संपत आहे. अवघ्या काही वेळातच गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. चामोर्शी मार्गावरून अनेक मंडळांच्या मिरवणूका निघणार आहेत. मुख्य म्हणजे, रेड्डी गोडावून परिसरातील गणेश मंडळाची मिरवणूक मोठी राहणार आहे. मात्र या मंडळाच्या मंडपापासूनच गणरायाला खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. चामोर्शी मार्गावर मोठमोठे खड्डे आहेत. यामधून तरूणाईला नाचणे तर दूरच पायी चालणेही कठीण होणार आहे. चंद्रपूर मार्गावरसुध्दा महमार्गाचे काम सुरू असल्यामुळे तलावापर्यंत ऐकेरी वाहतूक व्यवस्था आहे. यामुळे गणेश भक्तांना मिरवणूकीत मनमुराद आनंद लुटण्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. शहरातील मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्तेही खड्डे आणि चिखलाने माखलेले आहेत. यामुळे गल्लीबोळातून येणाऱ्या गणेशाच्या मिरवणूकांना चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-12


Related Photos