राज्यभरात गणरायाला निरोप, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच येणार


वृत्तसंस्था / मुंबई :  आज १२ सप्टेंबर रोजी  अनंत चतुर्दशीला राज्यभरातील गणेशभक्त जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. मात्र पुढल्या वर्षी गणपती बाप्पा ११ दिवस आधीच येणार असल्याची माहिती पंचांगकर्त्यांनी दिली आहे. 
पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी शनिवार  २२ ऑगस्ट रोजी येणार आहे. त्यानंतरच्या वर्षी शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेशचतुर्थी येईल. सध्या बाप्पांना निरोप देत असलेल्या भाविकांना काही ठिकाणी पावसाचाही सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु राहणार आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-12


Related Photos