भामरागडमध्ये पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पोहचली मदत


- तहसील कार्यालयामार्फत नागरीकांना होणार साहित्याचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पूर ओसरल्यानंतर सामाजिक संस्था तसेच शासनाकडून मदत पोहचविली जात आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनीही भामरागडसाठी मदत पाठविली आहे. 
ना. मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या साहित्याचे वाहन भामरागड मध्ये दाखल झाले. यामध्ये ३ हजार २०० साड्या, १ हजार ब्लॅंकेट, १  हजार नग चटई, १ हजार ८ नग टाॅवेल, १०० नग रेनकोट असे साहित्य पाठविण्यात आले आहे. हे साहित्य तहसील कार्यालयामार्फत गरजू नागरीकांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-12


Related Photos