पुरग्रस्तांना मदत करताना सावधान, संधीसाधू लोकांच्या भुलथापांना बळी पडू नका


- महारोगी सेवा समितीच्या अधिकृत खात्यावरच मदत जमा करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत प्रशासनाने संपूर्ण देखरेख ठेवली होती. पुरातून सर्व नागरीकांना सुखरूप् बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भामरागड मधील पुरग्रस्तांसाठी शासकीय मदत पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र काही संधीसाधू लोक सोशल मिडीयावर मदत करण्याचे आवाहन करीत स्वतःचे बॅंक खाते क्रमांक पसरवित आहेत. अशा लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.
लोकबिरादरी प्रकल्पामार्फत महारोगी सेवा समिती वरोरा च्या अधिकृत खात्यावरच रक्कम जमा करावी. पैसे जमा केल्यानंतर आपल्या ई मेलमध्ये हे पैसे पुरग्रस्तांसाठी पाठवित असल्याबाबत स्पष्टपणे लिहावे. बॅंक खात्याची माहिती देण्यात आली असून या खात्यावरच रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-12


Related Photos