महापोर्टल द्वारे परीक्षा बंद करा


- युवा विकास बहुउद्देशीय  संस्था,  भगतसिंग फॅन क्लब ची मागणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
राज्यशासनाच्या नौकर भरतीत अचानकपणे बदल करण्यात आले.   परीक्षा महापोर्टलमार्फत घेण्यात येत आहेत. यामध्ये परीक्षार्थींना खुप संकटांना सामोरे जावे लागत आहे. सर्व विद्यार्थ्यांचे पेपर हे वेगवेगळ्या तारखेला असल्याने कुणाचे पेपर सोपे तर कुणाचे कठीण असे ठरत आहे. स्पर्धा परीक्षेचे स्वरुप हे एखाद्या लाॅटरी सारखे झाले आहे. यामध्ये मेहनती, अभ्यासू, गुणवत्ताधारक परीक्षार्थींचा नुकसान होत आहे, यामुळे महापरीक्षा पोर्टल मार्फत परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी युवा विकास बहुउद्देशीय  संस्था अहेरी  व  भगतसिंग फॅन क्लब अहेरी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. 
महापरीक्षा पोर्टलबाबत  पुणे, बीड, औरंगाबाद, नांदेड व चंद्रपूरला विद्यार्थ्यांनी  निषेध नोंदविला आहे. यानंतर अहेरी क्षेत्रातून रुपेश गावडे, अश्विन मडावी, शुभम निलम यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना  काल  ११ सप्टेंबर रोजी निवेदन सादर करण्यात आले.
या पद्धतीत परीक्षा नागपूरला ऑनलाईन होत असल्याने भामरागड, एटापल्ली सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थीनी, महिलांना एक दिवस अगोदरच येऊन रहावे लागत आहे व परीक्षा केंद्राचा  पत्ता न मिळण्याबाबतही अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यामुळे ऑनलाईन परीक्षा पद्धत बंद करण्याची मागणी होत आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-12


Related Photos