पोलिस कर्मचारी, कुटुंबीयांच्या मागण्या निकाली काढा


- पोलिस बाॅईज असोसिएशनची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यातील पोलिस कुटुंबीयांच्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढण्यात याव्यात, अशी मागणी गडचिरोली पोलिस बाॅईज असोसिएशनने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
पोलिस बाॅईज असोसिएशनच्या एका सदस्यास आमदार म्हणून विधान परिषदेत स्थान देण्यात यावे, संपूर्ण गडचिरोली जिल्हा अतिसंवेदनशिल, दुर्गम आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिडपट वेतन देण्यात यावे, जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होतील त्यावेळी कुटुंबातील एका सदस्यास शैक्षणिक दर्जानुसार पोलिस खात्यात सामावून घ्यावे, होमगार्ड ना शासकीय सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे, पोलिस पाल्यांना गडचिरोली शहरामध्ये वस्तीगृहाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, संपूर्ण राज्यातील आर्थिक दुर्बल घटक म्हणून खुल्या प्रवर्गातील नागरीकांना १२ फेब्रुवारी २०१९ रोजी शासकीय नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात आले.  मात्र जिल्ह्यातील पोलिस भरतीत हे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यात आर्थिक दुर्बल घटकाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथील नोकर भरतीत १० टक्के आरक्षण तत्काळ लागू करावे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया , नाशिक वगळता संपूर्ण राज्यात पोलिस भरतीची जाहिरात निघाली असून गडचिरोली , चंद्रपूर, गोंदिया व नाशिक या जिल्ह्यातील जाहिरात काढण्यात यावी, जिल्ह्यातील पोलिस भरतीच्या उमेदवारांमध्ये सध्या भरती निघेल किंवा नाही, न निघाल्यास कुठे अर्ज करावा आणि पोलिस भरतीचे पेपर एक होणार की दोन याबद्दल शंका उपस्थित झाल्या आहेत पोलिस प्रशासनाने याबाबत एखादे परीपत्रक काढून उमेदवारांच्या शंकांचे निरसन करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देताना गडचिरोली पोलिस बाॅईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, शहर अध्यक्ष अभिलाष येनगंटीवार, शहर उपाध्यक्ष आकाश करमे, सदस्य ओमप्रकाश वट्टी, अस्लम शेख, बंडावार व पदाधिकारी उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos