महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यामध्ये एच आय व्ही/एड्स ची कलापथकाद्वारे जनजागृती मोहिमेला प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांचे अंतर्गत ८ फेब्रुवारी २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेरा आणि अहेरी तालुक्यातील एकूण १५ ठिकाणी एच आय व्ही / एड्स व लैंगिक आजार व गुप्त रोग प्रतिबंध उपचार या बाबत सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने लोककला कलापथक या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. 

मुलचेरा तालुक्यातील गोमानी या गावातून ८ फेब्रुवारी २०२४ रोजी या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. नागरिकांना, स्थानिक युवकांना व स्थलांतरित कामगार यांना एच आय व्ही / एड्स व लैंगिक आजार व गुप्त रोग आजाराबाबत मार्गदर्शक कलापथकच्या माध्यमातून केले. प्रत्येक नागरिकांनी जवळच्या सरकारी दवाखान्यातील (ICTC) समुपदेशन व तपासणी केंद्रातून एचआयव्हीची तपासणी करणे आवश्यक आहे असे आवाहन सांस्कृतिक प्रमुख यांनी केले. 

या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली जिल्हा कार्यक्रम अधिकारी  महेश भांडेकर आणि डॉ. अभिषेक गव्हारे (CSO), यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक मदत ICTC समुपदेशक आणि सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्थेचे सांस्कृतिक प्रमुख संजय मेकर्तीवार आणि त्यांची कलावंत समूह जनजागृती साठी प्रयत्न करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos