अपघातास आमंत्रण देणारे झाड हटविण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
  सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे जंगलातील रस्त्याच्या  बाजुवरील काही वृक्ष कोसळले.  आष्टी -  आलापल्ली मार्गावर मार्कन्डा (कं) येथील वनविकास महामंडळाच्या  डेपो समोर मुख्य मार्गावर एक मोठे सागवान चे झाड़ काल सकाळ पासून रस्त्याच्या मधोमद तुटून पडले  आहे.  यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून झाड हटविण्याची मागणी होत आहे. 
 आष्टी -  आलापल्ली  मार्गावर नेहमी वाहनाची वर्दळ असते. मात्र पडलेल्या   झाडामुळे समोरिल वाहन दिसून येत नाही . त्यामुळे अचानक दोन वाहनाची धड़क होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   कालपासून या झाडाकडे संबधित विभागाचे लक्ष कसे गेले की नाही ही  आश्यर्याची बाब आहे.  झाड तातडीने हटवावा अशी मागणी केली जात आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos