जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे थाटात विसर्जन


-  डी जे च्या तालावर थिरकले कार्यकर्ते, नागरिक व युवक 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
 जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी दरवर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी विराजमान बाप्पाना आज ११ सप्टेंबर रोजी निरोप देण्यात आला. इंदाराम येथे थाटात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे भक्तिमय तसेच उत्साहाचे वातावरण होते. 
 इंदाराम अजय कंकडालवार यांच्या निवासस्थानी दहा दिवस  गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली.   आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत, डी जे च्या  तालावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अबालवृद्धासंह सर्वच सहभागी झाले होते.  अगदी  पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos