महत्वाच्या बातम्या

 कारागृहातील कैद्यांसाठी बायोमेट्रिक टच स्क्रीन सुविधा


- जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन, अद्ययावत पाकगृहाचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत सरकारच्या उपक्रमातंर्गत आय.सी.जे.एस (ICJS) या प्रकल्पाच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांच्या सोयी-सुविधेत वाढ करण्यासाठी बायोमेट्रिक टच स्क्रिन किऑस्क (Biometric Touch Screen Kiosk) मशिनचे उद्घाटन तसेच कारागृहातील अद्ययावत पाकगृहाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडले.

जिल्हा कारागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला मुख्य न्यायदंडाधिकारी शेखर गोडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी सतिश सोनवणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अभियंता व्ही.आर. अंबुले, कनिष्ठ अभियंता रूपेश चेंदे आदी उपस्थित होते.

बायोमेट्रीक टच स्क्रिन किऑस्क च्या माध्यमातून बंद्यांना त्यांच्या बायोमॅट्रीक फिंगरप्रिंटच्या सहाय्याने त्यांच्या केस प्रकरण संदर्भातील अद्ययावत माहिती, मनिऑर्डर, बंदी वेतन, पॅरोज/फर्लो रजा, मुलाखत सुविधा, दूरध्वनी सुविधा, माफी व इतर आवश्यक माहिती पाहणे शक्य होणार आहे.

णे आवश्यक राहील. त्यानंतर सदर लिंक बंद करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे चंद्रपूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos