महिला महाविद्यालय गडचिरोलीच्या अर्थशास्त्र विभागाची बॅंकेला शैक्षणिक भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक महिला महाविद्यालय गडचिरोलीच्या अर्थशास्त्र विभागाने बॅंकेला शैक्षणिक भेट दिली .  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे शैक्षणिक सत्र २०१६ पासून सीबीसीएस प्रणाली लागू करण्यात आली. त्यात बी.ए भाग २  साठी अर्थशास्त्र या विषयात बॅकिंग घटकाचा समावेश करण्यात आला.
त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना बॅकेचे कामकाज जवळून बघता यावे व विद्यार्थ्यांना बॅंकेचे कार्य प्रत्यक्षात समजावे यासाठी प्राचार्य डाॅं. हंसा तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्राचे प्राध्यापक अविनाश भुरसे यांनी शैक्षणिक भेटीचे आयोजन केले.
मूल रोड वरील बॅंक ऑफ  इंडिया या राष्ट्रीयकृत बॅंकेला ही शैक्षणिक भेट देण्यात आली. यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांना व्याजदर कसा ठरविला जातो, बॅंक खात्याचे प्रकार, प्रत्यय निर्मीती या बद्दल माहिती दिली.
तसेच प्रा. अविनाश भुरसे यांनी विद्याथ्र्यांना एटीएम चे प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांना एटीएम कार्ड चा उपयोग कसा करायचा हे सांगितले. सदर शैक्षणिक भेटीत अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सदर शैक्षणिक भेटीसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos