औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणावरुन १ हजार ६८०  कोटी ५० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली आहे. या योजनेचा औरंगाबाद शहरातील सुमारे १६  लाख लोकसंख्येला लाभ मिळणार आहे.
मराठवाड्याची जीवनरेखा असणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्यातून औरंगाबादकरांची तहान भागविली जाते. वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहराची लोकसंख्यादेखील वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढत आहे. यासाठी जायकवाडी धरणातून जास्तीचे पाणी औरंगाबादला उपलब्ध करुन देण्याच्या पाणी पुरवठा योजनेस मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-09-11


Related Photos