लोककलावंतांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री डॉ. परिणय फुके


- जिल्हास्तरीय लोककलावंतांचा भव्य मेळावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
लोककलावंतांच्या समस्या सोडविण्यासाठी वर्तमान शासनाने काटेकोरपणे प्रयत्न केले आहे. कलावंतांचा कोटा साठ वरुन शंभर केला व 1500 रुपयांवरुन  मानधन दिडपटीने वाढवून 2 हजार 250 रुपये केला आहे. हे शासन लोकहिताचे निर्णय घेवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. 
विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान (नागपूर) तथा करंट झाडीपट्टी कलाकार संस्था रेंगेपार कोठा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय लोककलावंतांचा भव्य मेळावा कार्यक्रम संताजी मंडळ कार्यालय, लाखनी जि. भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी  आ. बाळा काशिवार, डॉ. गजानन डोंगरवार, घनशाम पाटिल खेडिकर, शेषराव वंजारी, शिवरामजी गिर्हेपूंजे, अविनाश ब्राम्हनकर, डॉ. श्याम झिंगरे, राजेश बांते, श्रावनजी कापगते, वसंत कूमरे, कोमल गभने, वाल्मीक लांजेवार,चूड़ामन लांजेवार, दामोदर मेहर, आशीर्वाद राहूले, नायब तहसीलदार श्रीमती दोनोडे, पदमाताई जैस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. फुके म्हणाले की, मकरधोकड़ा येथे भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने 47 एकर जागेवर 1500 कोटी खर्च करुन बायोइथेनोल प्रकल्प उभारला जाणार आहे. ज्यात 10 ते 12 हजार बेरोज़गार युवकाना रोज़गार मिळणार आहे.  तसेच देवरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे उद्योगाकरीता जागा मिळवून देूवन नुकतेच स्टील प्लांटचे लोकार्पण केले व त्यामुळे येथिल 2 ते 3 हजार  स्थानिक बेरोज़गाराना रोज़गार मिळेल. त्यात प्राधान्याने कलावंतांच्या मुलांना रोज़गार देण्यात येईल, असे ते म्हणाले.
 “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट”  करण्याचे देशाचे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने या भागात एनएनटीआर  प्रकल्प विकसित केला जाणार आहे.  येथे देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण आणि मोठया प्रमाणात रोज़गार निर्मिती करुन पर्यटन क्षेत्रात क्रांति घडणार आणि ज़िल्हयाचा चेहरा बदलविणार आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी आमदार बाळा काशिवार यांनी कलावंतांना आवाहन केले की, प्रामाणिकरित्या काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यासोबत राहून आपल्या मागण्या व हक्क आपल्या पदरी पाडून घ्या. भूलथापा देणाऱ्या लोकप्रतिनिधी पासून सावध रहावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत कूंभरे यांनी केले तर  संचलन पाखमोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार  राजेश पंधरे यांनी मानले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-11


Related Photos